Wednesday 8 January 2014

वळीवाच्या सरी


लस लसते जीवन 
तळ हातीचा निखारा
 एका  हाके साठी कैसा 
उरी डोंब उसळता  ?

त्याची अबोल चाहूल 
त्याचा गंध परीमळे
 माझ्या प्राणा आगे मागे 
त्याचा लपंडाव चाले |

घर लख्ख लख्ख केले 
साऱया लिम्पल्या खिडक्या 
त्याच्या येण्यासाठी माझा 
जीव वाटुली जाहला |

नाही निरोप धाडीला
कसा विसर पडला ?
त्याच्या गोंदण पाउली
 असा खेळ मांडलेला |

वेशी पुढे कोस चार  
उभी एकटी कधीची 
पदराड  स्वप्न दिवा
अन वळीवाच्या सरी 


                             - अतिंद्र सरवडीकर 

No comments:

Post a Comment