Thursday 13 September 2018

प्रीतबीज

स्पर्श पार प्रीत प्रेम जागू देत,
शब्द-शब्द मौन-मौन पोहचू देत !

अर्थ भाव गीत स्नेह नांदू  देत
स्वप्न न्हात चांदण्यात राहू देत l

दूर गाव दूर वाट सांजवेल
ठेच लागे हात हाती राहु देत l

डोह खोल चंद्र बिंब सापडेल
त्या तिथेच प्रीतबीज अंकुरेल l

साद देत साद घेत चालुयात
तू मला नी मी तुला, अजून काय?

                     - डॉ अतिंद्र सरवडीकर