Monday 12 August 2013

कोसळणारा पाउस... स्टेशन वरची ही sss गर्दी... आधीच काही कटकट झाल्याने वैतागलेलो ...बरोबर ३ पिशव्या.. कसा बसा पुणे मुंबई इंटरसिटी चा मासिक पास धारकांचा डबा गाठलाय ... नुसता पास असून उपयोग नसतो ... लोक पुढे बसणार्या त्यांच्या खास लोकांसाठी जागा पकडतात.. नंतर तिथे जुगiरा चा अड्डा जमेल ... हुश्श बसलो .. गाडी सुटली ... एक आजी आजोबा उभे आहेत आणि समोर बसलेला एक driver सदृश इसम आरामात हातपाय पसरून झोपलाय पण त्यांना बसू देत नाहीये ... मी उठून त्यांना बसा म्हटल तर ते नको म्हणाले.. मी म्हटल पास च्या डब्यात का आलात ? म्हणाले इतर डब्यात चढता येत नाही ... च्क्क ... समोर फलाटा वर काही लोक डोक्यावर मोठ्या टोपल्यात बहुदा मासे ने आण करतायत ... चक्क एक पिशवी उघडून एका कावळ्याने एक अख्खा पापलेट पळवलाय.... आता कावळाच पाळीन म्हणतो !! :D  मगाशी एक भिकारी बसकट आवाजात खंडेरायाच्या लग्नाला म्हणत होता ...पण ठसका आहे साल्याच्या आवाजात..तीच चाल फिरली बराच वेळ डोक्यात ! कर्जत आल आता गाडी pack झाली... मगाचे आजी आजोबा आता त्रासलेले दिसतायत... मी खुण केली ... आजी चुपचाप माझ्या जागी येउन बसल्यात... चांगली गौगल बीगल घातलेली माणस जुगारातल्या पैश्यान वरून भांडतायत... आता आवाज चांगलाच चढलाय ... माझ्या इयर फोन मध्ये अण्णांचा पिळदार षड्ज लागलाय... काय सुरॆख सम गाठ्लीये ... !
दुख दारिद्र्य दूर कीजे सबन को सुख देवो करतार ... करीम नाम तेरो...