Saturday 25 January 2014

आकांत

तुझी हाक एक भास
हवा हवासा … 

तुझी याद डसे साप
प्याला विषाचा … 

तुझी आस जिव्हारी खोल
चालला तोल  … 

तुझी साथ मृगाचे जळ
युगाची प्यास …

तू हासता ये  मधुमास
सरे निमिषात … 

तू पाहता थांबतो श्वास
प्राण प्राणात … 

तू लाजता तशी गालात
कळ्या फुलतात … 

तू चालता  सोडूनी हात
ऊरी आकांत … 

                      - अतिंद्र सरवडीकर

No comments:

Post a Comment