Wednesday 8 January 2014

दारी पाउस पाउस 
मन हिरवं हिरवं 
माझ्या दारात मांडव 
येई  बहर बहर ।

धारा कोसळे संतत 

धुंद मातीचा दरवळ 
फुला पल्लवत दाटे 
कसा भरून भरून ।

वारा सावळा सावळा 

नभी कोंदला कोंदला 
सा ऱ्या  धरतीला आली 
एक मोतीदार कळा  |

मेघ धून निळी निळी 

रंग रंगात  नहाती 
भुई मातेच्या कुशीत 
सारे नव्याने जन्मती |

अश्या पावसाच्या राती 

येई साजणाची सय 
उरी ठस ठसणारी 
 थोडी कावरी बावरी । 

मिटल्यावरी  डोळे  

येती सरींचेच नाद 
मन पिंजला कापूस 
होई सोयरा पाउस । 


                  - अतिंद्र सरवडीकर 

No comments:

Post a Comment