Thursday 13 July 2023

 


"व्रतस्थ संगीत साधनेची तप्तमुद्रा" 
                            - प्रथमेश अवसरे 

येत्या १५ जुलै रोजी कै सिद्धा पाटील स्मृती समिति तर्फे संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल युवा पिढीतील प्रतिभावान गायक  डॉ अतिंद्र सरवडीकर यांना  बालगंधर्व सन्मानाने गौरविण्यात येणार आहे. यानिमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा थोडक्यात आढावा घेणारा हा लेख 
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

एक काळ सर्वच क्षेत्रात सर्वस्व पणाला लावून काम करणारी आदर्श व्यक्तिमत्वं  विपुल प्रमाणात होती. आजच्या पिढीला अशी माणसं माहीत आहेत का ? व्यासंगाची, कष्टांची, स्वतःच्या कामात झोकून देण्याची तयारी यांच्या ओळखीची आहे का ? धंदेवाईक विद्वत्तेच्या आणि संपर्क माध्यमांच्या वेढ्यात अडकलेल्या कोवळ्या मनांची सतत दिशाभूल होत असताना, ध्येयवाद कसा जपला जातो याची यांना कल्पना आहे का ? भोवतीच्या अफाट गतिशील काळानं आणि भोवतालच्या आर्थिक सामाजिक परिस्थितीने ज्यांच्या शारीर-मानस सामर्थ्यावर प्रचंड दबाव आला आहे अशा नव्या पिढीचे अनेक प्रतिनिधी आपल्या आसपास वावरत असताना असे प्रश्न आपल्या मनात सहज उमटू शकतात. पण अपवाद असतात आणि तेच त्यांच्या क्षेत्राचा स्तर उंचावत असतात. 

डॉ. अतिंद्र सरवडीकर यांचा जन्म सोलापूर येथे झाला. बहुतेक कला क्षेत्रातल्या व्यक्तींचा होतो तसा संगीत शिक्षणाचा त्यांचा मुळारंभ घरातूनच झाला. आई वृंदा सरवडीकर सोलापूरच्या सिद्धेश्वर प्रशालेत संगीत शिक्षिका. त्यांच्या कडून स्वर ओळख झाली. पुढे स्व दत्तूसिंग गहेरवार यांचं मार्गदर्शन लाभलं. गाण्यातल्या विशारद वगैरे परीक्षा झाल्या. जोडीला तबला ही शिकणं सुरु होतं आणि त्यातही विशारद पदवी मिळवली. हे सगळं घडत होतं त्यांच्या वयाच्या केवळ १५/१६ व्या वर्षी. त्या न कळत्या वयात शाळेचा अभ्यास, मित्रांबरोबर खेळणं बागडणं तसंच संगीतही सहज वाटायचं. ते करणं म्हणजे काही वेगळं करतोय असं वाटायचंच नाही. १० वी ला बरे मार्क मिळाले आणि अतिंद्र मित्रांबरोबर ११ सायन्सला आपसूक दाखल झाला. पण दिवस जात राहिले तसे मनोवस्थेत बदल घडू लागले. याच सुमाराला निर्माण झाली ती गाणं ऐकण्याची पराकोटीची आवड! शास्त्रोक्त संगीतातल्या दिग्गजांचा कलाविष्कार रात्रंदिवस ऐकण्याचा अक्षरशः सपाटा सुरु झाला. आणि मग आपण गाण्याशिवाय राहू शकत नाही, हेच आपलं कार्यक्षेत्र आहे हा साक्षात्कार ही  झाला.             
 
चांगल गायक व्हायचं तर आधी उत्तम गुरु हवा, पक्की शिस्तबद्ध तालीम हवी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गाण्याच्या परीक्षा वगैरे पलीकडे जाऊन घरंदाज गायकीचं  भांडवल हवं याची जाणीव झाली. विविध कलाकारांचं गाणं ऐकत असताना डॉ प्रभा अत्रे यांच्या गाण्याकडे अतिंद्रचं मन विशेष आकर्षित झालं होत. त्यांच्या गाण्यातली नवनिर्मिती, त्यातलं बुद्धी आणि भावनेला असणारं आवाहन, सादरीकरणातली एकूणच परिपूर्णता हे सगळं अनुभवून, आपण  शिकायचं तर यांच्याकडेच असा  मनाचा निर्धार झाला होता. गुरु नुसता प्रसिद्ध कलाकार असून चालत नाही त्याच्या व्यक्तिमत्वात गुरुतत्व हवं. शिष्य घडवण्याची इच्छा आणि क्षमता त्याच्या ठायी असली पाहिजे. प्रभाताई या सर्वच बाबतीत परिपूर्ण होत्या. पण प्रभाताई मुंबईत आणि अतिंद्र सोलापुरात. मग सुरु झाला शिक्षणासाठी सोलापूर - मुंबई असा प्रवास. आणि पुढे सोलापूर, इथलं घरचं सुरक्षित वातावरण सोडून लहान वयातच मुंबई सारख्या महानगरीत स्थलांतरित होणं. 

प्रभाताईंसारख्या स्वयंभू प्रतिभेच्या कलाकारांकडे शिकणं काही सोपं नसतं. त्यासाठी हर तर्हेच्या कसोटीला सिद्ध व्हावं लागतं. अतिंद्रने ते काम निष्ठेनं केलं आणि गुरुप्रसाद संपादन केला. गुरूंनी उत्तम प्रकारे ज्ञान दिलं आणि अतिंद्रने मन लावून कठोर परिश्रम केले. अखंड रियाझ केला. अत्यंत प्रभावी प्रत्यक्ष गायन क्रियेबरोबरच गुरुवर्य प्रभाताईंचे रचनाशीलता, लेखन, संशोधन, शिक्षण अशा विविध क्षेत्रातले पैलूही आत्मसात केले. पुढील काळात त्यातही ख्याती प्राप्त केली. मुंबई विद्यापीठानं प्रदान केलेली सगळ्यात पहिली संगीत विषयातली डॉक्टरेट पदवी प्राप्त करण्याचा बहुमान ही डॉ. अतिंद्र सरवडीकर यांना प्राप्त आहे. 

त्यांनी आपल्या शालेय व कॉलेज जीवनात विविध संगीत स्पर्धांमध्ये मिळालेले २८ राज्यस्तरीय व देशपातळीवरील पुरस्कार,भारत सरकारची विशेष गुणवत्ता राष्ट्रीय शिष्यवृत्ती, पं भीमसेन जोशी शिष्यवृत्ती,मुंबई आकाशवाणीची उच्च श्रेणीची अर्हता हे आणि असे अनेक बहुमान प्राप्त केले आहेत.  

आपल्या आता पर्य॔तच्या यशस्वी कार्यकिर्दीत शास्त्रीय संगीताबरोबरच, ठुमरी, दादरा, गीत, गझल, भक्तिसंगीत, फ्युजन अश्या अनेक प्रांतात मुक्त संचार केला आहे . देश विदेशातल्या अनेक प्रतिष्ठित व्यासपीठांवर डॉ अतिंद्र सरवडीकर यांनी आपल्या संगीत साधनेचा अभूतपूर्व परिचय दिलेला आहे. यामध्ये सवाई गंधर्व समारोह कुंदगोळ, इंडिया फेस्टिवल लंडन, सप्तक समारोह अहमदाबाद, राष्ट्रीय संगीत परिषद कलकत्ता, ओरिसा राज्य संगीत महोत्सव, पूरब अंग ठुमरी महोत्सव बनारस, एनसीपीए मुंबई, पुलोत्सव पुणे यांसारख्या जगविख्यात समारोहांचा समावेश आहे. सुगम संगीताबरोबरच रागदारी संगीताच्या त्यांच्या जवळपास तीनशे बंदिशी त्यांनी रचल्या असून त्या प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. या बंदिशींमध्ये काही अत्यंत अभिनव प्रयोग असून त्यांचं संगीत चिंतन त्यात पुरेपूर उतरलेलं आहे. 

मराठी - हिंदी बरोबरच तामिळ भाषेत गायलेली त्यांची गाणी विविध माध्यमांतून आज सर्वत्र उपलब्ध आहेत आणि आजच्या युवा पिढीत विशेष लोकप्रिय ठरली आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे ज्यामध्ये राष्ट्रीय उस्ताद अल्लाउद्दीन खाँ पुरस्कार, कलासाधना पुरस्कार, पद्मश्री कविवर्य द रा बेंद्रे पुरस्कार, कलारत्न, प्रमिलाबाई देशपांडे पुरस्कार, नुकताच मिळालेला सोलापूर रत्न पुरस्कार इत्यादींचा समावेश आहे.

 डॉ अतिंद्र सरवडीकर यांनी लिहिलेली "किराणा घराणे परंपरा आणि प्रवाह" तसेच "मध्यान्हीच्या मैफली" ही दोन संगीत विषयक पुस्तके प्रकाशित असून संगीत क्षेत्रात या पुस्तकांना अतिशय महत्वाचं स्थान प्राप्त आहे. सध्या मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागात प्राध्यापक म्हणूनही ते कार्यरत आहेत. 

डॉ. अतिंद्र सरवडीकरांचं स्वतःच्या पद्धतीनं स्वतःच्या कामात असणं, अतिशय नम्र व साधं असणं, इतर कुणाची नक्कल न करता स्वतःला स्फुरलेलं संगीत सादर करणं, स्वतःच्या शैलीत स्वतःचं आयुष्य खास बनवून घेऊन जगणं, हे मला खूप महत्त्वाचं वाटतं. आजच्या काळात संवेदनशील व विचारी माणसांचं आपल्याला लाभलेलं अस्तित्व मला अनेक कारणांनी विलक्षण महत्त्वाचं वाटतं. अशा माणसांची कदर होणं हेही तितकंच महत्वाचं असतं. कै सिद्धा पाटील स्मृती समिति तर्फे संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान  दिलेल्या कलाकारांचा राज्यस्तरीय बालगंधर्व सन्मान देऊन यथोचित गौरव केला जात असतो. यावर्षी डॉ अतिंद्र सरवडीकर यांची या सन्मानासाठी निवड करण्यात आली आहे. येत्या १५ जुलै रोजी सायं ५:०० वा हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात डॉ. अतिंद्र सरवडीकर यांना  सन्मानित करण्यात येणार आहे. युवा पिढीतल्या व्रतस्थ संगीत साधकाची योग्य प्रकारे दाखल घेतली जाणार आहे.  डॉ. अतिंद्र सरवडीकरांच्या साधनेची तप्त मुद्रा संगीत क्षितिजावर आता उमटू लागली आहे. निस्सीम संगीत प्रेमींसाठी ही अतिशय समाधानाची बाब आहे. 


Sunday 2 July 2023

अलख

 


गुरुतत्व का तेजस्वी अनुभव

गुरुतत्व का तेजस्वी अनुभव: डॉ प्रभा अत्रे जी का शिष्यत्व प्राप्त होना बहुत ही बड़ा सौभाग्य है!  मेरा जन्म तथा शुरुवाती शिक्षा सोलापुर में हुई।  प्रभाजी का निवास पूना या मुंबई जैसे शहरो मे था।  लेकिन उनकी गायकी का ऐसा सम्मोहन था की सीखना है तो इन्हीसे ऐसा मैंने छोटी सी उम्र में ही ठान लिया था।  कोई भी पूर्व पहचान न होने के बावजूद मै एक दिन मुंबई आया और हिम्मत जुटा कर उनसे मुलाकात की। मेरी परीक्षा करने के बाद प्रभाजी ने मुझे शिष्य के रूप में स्वीकार किया और इस प्रकार अप्रैल २००३ से उनसे संगीत शिक्षा प्राप्त होने का सिलसिला शुरू हुआ जो आजतक जारी है । उनका गाना प्रेडिक्टेबल नहीं है, उसमे कई सरप्राइजेस आते रहते है।  इस गायकी का फार्मूला नहीं हो सकता, और इसी कारन उनसे  सीखना बेहद मुश्किल है।  प्रभाजी का सतत संगीत के चिंतन में रहना मुझे शिष्य के रूप में बेहद करीब से अनुभव करने मिला। वह जैसे किसी ऋषि की आत्मलीन तपस्या का प्रत्ययकारी दर्शन था।  इस अनुभव का मुझपर बहुत गहरा असर हुआ ।  छोटी छोटी बातो मे भी उनके व्यक्तित्व से विनयशीलता, सच्चाई, निष्कपटता हमेशा महसूस होती रहती थी।

 भारतीय संगीत में महिला गुरु बहुत कम हुए हैं। बहरहाल, हमारे समाज में महिलाओं की स्वतंत्र उपलब्धियों को बहुत देर से पहचाना गया। पुरुषों की तुलना में महिलाएं निचले दर्जे की मानी जाती थी। शायद इसीलिए एक महिला पुरुष शिष्यों की गुरु हो यह बात किसी भी क्षेत्र में स्वीकार नहीं हो सकती थी।  लेकिन फिर भी भीमसेन जोशी केसरबाई से प्रभावित हुए, कुमार गंधर्वजी ने बड़ी भक्ति के साथ अंजनीबाई मालपेकर के अधीन अध्ययन किया, मोगूबाई कुर्डीकर ने कुछ पुरुष शिष्यों को प्रशिक्षित किया, कुछ पुरुष शिष्यों ने  हीराबाईजी से भी सीखा। (सुधीर फडके जैसे महान गायक हीराबाई को अपना गुरु मानते थे), राजाभाऊ कोगजे ने रसूलनबाई से ठुमरी सीखी थी। ऐसे कुछ उदाहरण मिलते हैं !   उनकी बाद की पीढ़ियों में, कई पुरुष शिष्यों ने गंगूबाई हनगल, गिरिजा देवी, किशोरी अमोनकर, प्रभा अत्रे, वीणा सहस्त्रबुद्धे, धोंडूताई कुलकर्णी, माणिक भिडे, अश्विनी भिडे जैसे प्रसिद्ध गायिकाओं से स्वतंत्र रूप से सीखना शुरू किया। इनमें से कई शिष्य पेशेवर कलाकारों के रूप में भी सफल रहें। इसका कारण यह है कि गुरु तत्व और संगीत जैसी कला लिंग, जाति और उम्र के अंतराल से परे होते है।  

लेकिन योग्य शिक्षा पाने के लिए गुरु अवश्य ही अधिकारी और विचारक होना चाहिए। पुरुष गुरुओं से सीखकर पुरुषों की तरह अभिनय तथा मुख भंगिमाएं  करनेवाली, असहज आवाज़ में गानेवाली  कुछ महिला गायिकाएं हम देख सकते है। अच्छे गुरू में पुरुषों और महिलाओं की मुखर श्रेणी के अंतर को समझने के साथ-साथ गायन के स्वर (pitch) में आवश्यकता अनुसार बदलाव करके सिखाने की क्षमता होनी चाहिए । पुरुषों और महिलाओं का खुद को अभिव्यक्त करने का अलग अलग तरीका होता है जिसका  निश्चित रूप से उनकी कला प्रस्तुति पर भी असर होता है। एक महिला की कोमल, मधुर अभिव्यक्ति पुरुष की आवाज में ठोस, मजबूत लग सकती है, भले ही उसकी स्वरावली एक ही हो। उस अभिव्यक्ति पद्धति को कुदरती तौर पर पनपने देना चाहिए। शिष्य में संगीत की सहज अभिव्यक्ति का सुंदर भाव पैदा होना चाहिए। प्रभाजी स्वयं मुख्य रूप से पंडित सुरेशबाबू माने द्वारा प्रशिक्षित है।  उस्ताद बड़े गुलाम अली खान, उस्ताद अमीर खान जैसे समृद्ध मर्दाना आवाज वाले पुरुष गायकों के गायन से वह प्रेरित भी रही। लेकिन फिर भी, उनका अपना गायन मर्दाना नहीं हुआ, या किसी और की नकल नहीं लगा। इस जीवंत उदाहरण से मेरे सामने सुयोग्य आदर्श स्थापित हुआ।

मुझे सिखाते समय प्रभाजी ने सभी जरूरी पहलुओं पर पूरा ध्यान दिया। उन्होंने मुझे आवश्यक खरज साधना, पलटे, उचित उच्चारण, स्पष्ट सुरीली आवाज, सभी सप्तकों में गुंजायमान स्वर तथा एक अच्छा पुरुष स्वर बनने के लिए आवश्यक रियाज की विधि दिखाई। सबसे महत्वपूर्ण बात, उन्होंने मुझे कभी भी अपने महिला स्वर (pitch) में गाने के लिए नहीं कहा, हमेशा मुझे मेरे पुरूष स्वर  (सफ़ेद दो) में ही सिखाया। भले ही उन्हें इसके लिए कितनी तकलीफ़ उठानी पड़े! मेरी शिक्षा के दौरान उन्होंने यह विचार भी स्थापित किया कि पुरुष गायकों को वह बंदिशें गानी चाहिए जो उनके अनुकूल हो। जैसे उनकी स्त्री शिष्याए गायेंगी "जिया मोरा ना लागे बैरी बलमुवा" लेकिन मुझे सिखाते हुए उन्होंने उसमें "जिया मोरा ना लगे बैरी सजनिया" ऐसा बदलाव किया। यह पहली बार है जब किसी ने भारतीय संगीत में ऐसा विचार प्रस्तावित किया है। इससे भारतीय शास्त्रीय संगीत की प्रस्तुति में आमूल-चूल परिवर्तन हो सकता है। अर्थात ऐसा विचार प्रस्तुत करने के लिए भी बड़ी मात्रा में नए संगीत रचनाओंको बनाने की उच्च स्तर की प्रतिभा और रचनात्मकता होने की आवश्यकता है। प्रभा जी ने अपनी बंदिश की पुस्तक में सभी रचनाओं में पुरुष कलाकारों के लिए इस प्रकार से  अलग शब्दों का प्रयोग चयन किया हुआ है। 

मुझे प्रभाजी से उनके घर में रहकर गुरुकुल पद्धति अनुसार सिखने का सुअवसर मिला। इसलिए, दूसरे शिष्यों को वह कैसे सिखाती है यह भी मै करीब से देख सका। और मुझे दुगना फायदा मिलता रहा। उन्हों ने कई शिष्यों को बिना शर्त बड़े ही प्यार से, खुद के घर में रखकर खिला  पिलाकर संगीत की शिक्षा दी। स्नेहमयी और अत्यंत मिलनसार व्यक्तित्ववाली प्रभा जी सिखाते समय बहुत सख्त और कठोर होती हैं। यदि किसी स्वर का लगाव या कण, खटका गलत हो जाए तो शिष्य को कड़ी डांट मिलती है। वह कहती हैं की संगीत के विद्यार्थियों ने किसी भी प्रस्तुति को इतने अच्छे से सुनना चाहिए कि किसी भी गायक ने कितनी सांस ली है वह भी समझ आए। वे बंदिश को जस का तस पेश करने पर जोर देते हैं। सिखाते समय भी उनका गायन इतना परिष्कृत होता है की उसमें एक सुंदर, आनुपातिक मूर्तिकला जैसी सुंदरता महसूस हो। उनके गायन में सुंदरता के साथ एक गहरा अनुशासन भी है। 

प्रभाजी से शिक्षा प्राप्त करने के प्रारंभिक वर्ष मेरे लिए बहुत कठिन रहे। उनके सामने गाना मानो संघर्ष और ठोकरें खाते हुए दौड़ने की शर्त लगी हो। एक तो मेरी शुरुआती संगीत शिक्षा बहुत अलग रूप से हुई थी, उसमें मैं सोलापुर से आया हुआ सिर्फ 16-17 साल का पहली बार पुणे-मुंबई जैसे बड़े शहरों में आया हुआ नवयुवक था। प्रभा जी का उदात्त, देवतुल्य व्यक्तित्व, उनकी वाणी का तेज, इन सब का मुझ पर इतना दबाव बन जाता था की, उनके सामने मैं अपने मुख से एक शब्द भी नहीं निकाल पाता। बहुत कुछ सीखने की इच्छा तो रहती थी , लेकिन आत्मविश्वास की कमी, भय, हिचकिचाहट की मिश्रित भावनाएँ उस दौरान मेरे मन में भरी रहती थीं। लेकिन समय के साथ उनसे सीखने के जुनून ने इन सभी मुश्किलों पर काबू पा लिया। उनका गाना धीरे-धीरे समझ में आता गया। खौफ की जगह शत प्रतिशत समर्पण ने ले ली। मैंने बहुत मन लगाकर घंटों रियाज करना शुरू किया। स्वरों की आकर्षक बुनाई, उनके साथ पिरोए जानेवाले मधुर स्वर कण, मींड का इंद्रधनुष और खटकों का सटीक  प्रयोग,‌ हर सांगीतिक क्रिया के पीछे का कार्यकारण भाव,‌‌ प्रस्तुति का रसीलापन, भव्यता, तथा उसमें छिपे गहरे भाव मेरी अंतरात्मा से संवाद करने लगे।  सरगम और तानों के अद्भुत आकृतिबंध मेरे मन और मस्तिष्क में हमेशा झूमते रहने लगे। प्रभा जी के संगीत और विचारों की विशिष्टता को समझने की क्षमता उभरने लगी और संगीत का एक अलग ही रूप मेरे सामने प्रकट होने लगा।

प्रभाजी ने शुरू में कई दिनों तक यमन राग ही सिखाया। यमन जैसा राग उनकी सौंदर्यात्मक प्रस्तुति में इतना अलग लगता था कि मन भ्रमित हो जाता की क्या यह वही यमन राग है ? जो शुरुआती दौर में मैंने सीखा हुआ था? अ‌त्यंत सुरीला गूंजने वाला गंधार का न्यास, तीव्र मध्यम का तीक्ष्ण अग्र,‌ इन  जैसे स्वरों का विशिष्ट स्थान, कल्पक और प्रशांत आलापी,  गंधार ऋषभ से मींड के रूप में नाद ब्रह्म में विलय होने वाला षडज,‌‌‌‌ पेंचदार तथा बल युक्त गतिमान तान क्रिया,‌‌ लय का हाथ पकड़ कर आने वाली अनोखी सरगम सब कुछ अत्यंत सुंदर।  ‌ प्रभा जी जैसे विस्तृत तथा ठहराव युक्त अलाप शायद ही किसी और कलाकार ने किए होंगे। ‌ उनकी तान संरचना अत्यधिक संरचित, घुमावदार, तेज और अत्यधिक जटिल है। लेकिन खास बात यह है की उसकी मिठास कहीं भी कम नहीं होती! उनकी पूरी प्रस्तुति में ही माधुर्य कहीं  कम नहीं होता यह एक बहुत ही विशेषता है ।‌‌ शास्त्रीय संगीत प्रस्तुत करने वाले कई कलाकार माधुर्य से दूर ही रहते हैं इसीलिए सामान्य श्रोता उस संगीत का आनंद नहीं उठा पाते। प्रभा जी के संगीत में जानकारों के साथ-साथ सामान्य श्रोता भी आनंदित हो उठते हैं। नोटेशन लिखकर या याद रख कर उनका संगीत नहीं गाया जा सकता।  इसलिए उनका संगीत सुनने में जितना सहज मधुर लगता है गाने में वह उतना ही मुश्किल है। स्पष्ट नादमय शब्द उच्चारण, पूरे गाने में भरी हुई आंतरिक लय,‌ राग की चौखट में रहते हुए नयी स्वरा कृतियां ढूंढना,‌‌ आकर्षक रुप से सम पर आना श्रोताओं के लिए यह सब अद्भुत अनुभव होते हैं।‌‌ प्रभा जी से सीखते हुए संगीत का भव्य तथा अत्यंत ऊंचे स्तर का दर्शन मुझे होता रहा। ‌‌‌‌‌‌उन  दिव्य क्षणों से मेरी झोली भरती रही।‌ तालीम के बाद, कभी-कभी मैं उस रात सो भी नहीं पाता था। वह बंदिशें, लय का चक्र, राग में खोजे गए नए सृजनात्मक स्थलों की नक्काशी, सब एक के बाद एक जहन में घूमते रहता था। यह उन संगीत सिद्धांतों का आत्मबोध ही था। आज भी उन रागों और बंदिशों को गाते हुए ऐसा लगता है जैसे ताई सामने बैठकर सिखा रही हो और अनजाने में ही कभी कभी मेरी आंखें भर आती है। 

जब मैंने मुंबई विश्वविद्यालय से संगीत में डॉक्टरेट की उपाधि प्राप्त की, तो उन्होंने खुशी-खुशी मुझे एक पार्टी देने के लिए कहा था,  मेरी शादी में आशीर्वाद देने के लिए खास तौर पर सोलापुर आई थी। ‌ और जब मुझे कोरोना हो गया‌ था तब मेरे स्वास्थ्य की जानकारी लेने के लिए वह हर दिन अस्पताल में फोन करती थी।  ऐसी कई यादें हैं। उनसे ऐसा प्रेम प्राप्त करना और उस ऋण में रहना शिष्य के रूप में परम सौभाग्य है।

डॉ प्रभा अत्रे जी के मार्गदर्शन के कारण मैं सही दिशा में आगे बढ़ता रहा। मैंने गायकी के कौशल के साथ साथ ही उनकी शोध, चिंतन, शिक्षा और नए संगीत रचना करने की गुणवत्ता को आत्मसात करने का प्रयास किया। गायक के रूप में काम करते हुए मेरा रचनात्मक और लेखन कौशल सहजता के साथ खिल उठा। धीरे-धीरे 250 से 300 बंदिशों का निर्माण हो गया, सुगम संगीत,‌‌गीत ग़ज़ल  के क्षेत्र में कई नवीन रचनाएं जानी मानी म्यूजिक कंपनियों के द्वारा जारी की गई । पुस्तकें प्रकाशित हुई तथा संगीत में डॉक्टरेट भी प्राप्त हुई। यह सब गुरु आशीर्वाद का ही फल है ऐसा मैं मानता हूं। प्रभा जी ने मुझे ना केवल सिखाया बल्कि स्वयं कुछ निर्माण करने के लिए सक्षम बनाया,‌ प्रेरित भी किया। ‌

गुरु चरण लागो मोरे मन पावत सब सुख और ज्ञान

 सतगुरु संगत सबसे भारी जोत जगायें अंतर्यामी ।




भारतीय संगीतातलं कैलास लेणं: डॉ. प्रभा अत्रे

 "भारतीय संगीतातलं कैलास लेणं: डॉ. प्रभा अत्रे "

डॉ. अतिंद्र सरवडीकर

मो ९८२३६२६४८० ईमेल atindra२०१०@gmail.com 

स्वरयोगिनी पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे (जन्म 13 सप्टेंबर 1932) या भारतीय शास्त्रीय संगीताच्या इतिहासातल्या एक अत्यंत महत्वाच्या कलाकार आहेत. नितांत सुंदर गायनाबरोबरच चिंतनकार, सिद्धहस्त रचनाकार , लेखिका, कवयित्री आणि गुरु म्हणूनही त्या लोकप्रिय आहेत. त्यांच्या असामान्य व्यक्तिमत्वाबद्दल तसेच लाभलेल्या गुरू सहवासाबद्दल सांगत आहेत त्यांचे वरिष्ट शिष्य आणि ख्यातनाम गायक डॉ. अतिंद्र सरवडीकर 

-0-

डॉ प्रभा अत्रे भारतीय संगीतातलं जणू कैलास लेणं. भारतीय रागदारी संगीतातलं सौंदर्य आणि लालीत्य जनसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवणाऱ्या सर्वार्थाने श्रेष्ठ कलाकार... 

त्यांचा नादमय आवाज, सादरीकरणातली अफाट तयारी, नावीन्य, अगदी शेवटपर्यंत कायम राहणारी माधुरी, सहजता, व्यक्तिमत्त्वातली प्रसन्नता या सगळ्यांनी श्रोता तात्काळ प्रभावित होतो. पण मग चिकित्सेने थोडं निरखून पाहायला लागलं की या सगळ्या मागची त्यांची साधना, अखंड चिंतन, निर्मिती क्षमता हे सगळं पाहून मन थक्क होतं ! कलेचं शिवधनुष्य रसिकांसाठी त्यांनी इंद्रधनुष्य केलंय याची प्रचिती येते. 

शास्त्रोक्त संगीताच्या क्षेत्रात ज्यांना पूर्वपरंपरा लाभली आहे, ज्यांच्या घरातच संगीत होतं आणि ज्या निवडक गंडाबंध शिष्याना मोठ्या गुरूंची अनेक वर्षांची विशेष तालीम लाभली; अशांचाच पुढे कलाकार म्हणुन बोलबाला झाला असं साधारणपणे घडलेलं दिसतं. पण प्रभाताईंच्या बाबतीत अगदी आगळ घडलं! त्यांच्या घरात म्हणे त्यांच्या पूर्वी कोणी संगीत ऐकत सुद्धा नव्हतं. खरंतर सुरेशबाबू माने आणि हिराबाई बडोदेकर यांच्याकडूनही तशा थोड्याच कालावधीसाठी त्यांना प्रत्यक्ष तालीम लाभली. मग पुढचा सगळा प्रवास त्यांनी एकलव्याप्रमाणे स्वाध्यायाने केला. स्वयंप्रतिभेने संगीताच्या क्षितिजात उंच भरारी घेतली. अढळपद मिळवलं. उस्ताद अमीर खान आणि उस्ताद बडे गुलाम अली खान ही देखील त्यांची प्रेरणा स्थानं. आणि या दोन्ही उस्तादांना ही प्रभाताईंचं कौतुकच वाटायचं. त्यांनी युवा वयातल्या प्रभाताईंचं मैफलीतलं गाणं ऐकलं होतं आणि त्याला मनमोकळी दाद ही दिली होती. एकदा एका मुलाखतीत अमीर खान यांना विचारलं की तुम्हाला पुढच्या पिढीबद्दल काय वाटतं? तेव्हा त्यांनी त्यांच्या पुढच्या पिढीतल्या उत्तम कलाकार म्हणून प्रभाताईंच नाव आवर्जून घेतलं होतं. सुरेशबाबू आणि हिराबाईंनाही आपल्या या प्रज्ञावंत शिष्येचा अतिशय अभिमान होता. प्रभाताईंनी किराणा घराण्याचा वारसा नुसता चालवला नाही तर सर्वार्थाने समृद्ध केला.

आडवळणांनी या वळणावर: प्रभाताईंकडे गाणं शिकायला मिळणं हा माझ्या आयुष्यातला विलक्षण भाग्ययोग आहे. मी मूळचा सोलापूरचा आणि प्रभाताई पुण्या-मुंबईत. पण त्यांच्या गाण्याची मोहिनीच अशी जबरदस्त होती, की शिकायचं तर यांच्या कडेच असं मी न कळत्या वयातच ठरवून टाकलं. आधीची कुठलीही ओळख नसताना धाडसाने एकदा मुंबईला गेलो, त्यांची भेट घेतली आणि शिकवण्याची विनंती केली. माझं गाणं ऐकून थोडी पारख करून प्रभाताईंनी शिष्य म्हणून स्वीकारलं आणि अशाप्रकारे त्यांच्याकडचा माझ्या शिक्षणाचा प्रवास २००३ साली सुरु झाला. 

त्यांचं गाणं प्रेडिक्टेबल नाही. त्यात अनेक सरप्रायझेस असतात. आणि म्हणूनच ते शिकणं महाकठीण! त्यांची कुशाग्र बुद्धिमत्ता, मन मानेल तसा वळणारा आवाज आणि विलक्षण कल्पनाशक्ती क्षणोक्षणी थक्क करणारी. प्रभाताई अखंड संगीत चिंतनात असलेल्या मला जवळून अनुभवायला मिळालं आणि त्याचा माझ्या मनावर फार खोलवर परिणाम झाला. लहान सहान गोष्टीतही त्यांच्यातला खरेपणा, प्रामाणिकपणा, विनम्रता हे ही गुण सतत जाणवायचे. हे सगळे संस्कार माझ्या अंतर्यामी खोलवर रुजले. गुरूंनी दाखवलेल्या प्रकाशवाटेवरून चालताना अवघ जीवन उजळलं. 

गुरुतत्त्वाचा उत्कट अनुभव: भारतीय संगीताच्या क्षेत्रात स्त्री गुरु अगदी कमी होऊन गेल्या आहेत. एकतर आपल्या समाजात स्त्रियांच्या स्वतंत्र कर्तृत्वाला तशी उशिराच मान्यता मिळाली. स्त्रियांना पुरुषांच्या तुलनेत दुय्यमच स्थान होतं. एखाद्या स्त्री गुरुने अनेक पुरुष शिष्यांचं गुरु असावं हे कदाचित म्हणूनच पचनी पडणारं नव्हतं. पण तरीही भीमसेन जोशींच्या तानेवर म्हणे केसरबाईंचा प्रभाव पडला होता, कुमार गंधर्व अंजनीबाई मालपेकरांकडे फार भक्तिभावानं शिकले होते, मोगुबाई कुर्डीकरांनी काही पुरुष शिष्यांना तालीम दिली होती, हिराबाईंकडेही काही पुरुष शिष्य शिकले होते. (सुधीर फडकेंसारखे मोठे गायक हिराबाईंना गुरु मानत), राजाभाऊ कोगजे रसूलनबाईंकडे ठुमरी शिकले होते. अशी मोजकी उदाहरणं सापडतात! त्यांच्या पुढच्या पिढ्यांमध्ये गंगुबाई हनगल, गिरीजा देवी, किशोरी अमोणकर, प्रभा अत्रे, वीणा सहस्त्रबुद्धे, धोंडुताई कुलकर्णी, माणिक भिडे, अश्विनी भिडे यांसारख्या सुप्रसिद्ध गायिकांकडे अनेक पुरुष शिष्य मोकळेपणाने शिकू लागले असं आढळतं. या मधले अनेक शिष्य व्यावसायिक कलाकार म्हणूनही यशस्वी ठरलेत. याचं कारण म्हणजे गुरुतत्व आणि संगीतासारखी कला हे दोन्ही लिंगभेद, जाती-वर्ण भेद, वयातला फरक या सगळ्याच्या पलीकडे जाणारी आहेत. 

पण अर्थात गुरु तसा अधिकारी आणि विचारवंत हवा. पुरूष गुरूंकडे शिकून त्यांच्या सारखे पुरुषी हातवारे करणाऱ्या, असहज. अति जोरकसपणे गाणाऱ्या स्त्री गायिकाही आहेतच. स्त्री पुरुष यांच्या आवाजाच्या पट्टीतला फरक तसेच सादरीकरणाच्या लेहज्यातला फरक ओळखून शिकवण्याची क्षमता गुरुकडे असावी लागते. स्त्री आणि पुरुष यांची व्यक्त होण्याची आपापली वृत्ती असते. स्त्रीचे कोमल स्वरलगाव, नाजूक वळणं पुरुषी आवाजात ठोस, जोरकस वाटू शकतात. अगदी स्वरावली तीच असली तरीही. ते एक्सप्रेसशन तसच फुलू द्यावं. व्यक्त होण्याची अशी सहजसुंदर जाणीव शिष्यामध्ये निर्माण केली जावी. प्रभाताईंना स्वतःला सुरेशबाबूंची तालीम मुख्यत्वे मिळाली, तसेच उ बडे गुलाम अली खान, उ अमीर खान यांसारख्या भरदार मर्दानी आवाजाच्या पुरुष गायकांच्या गाण्यातून त्यांनी प्रेरणा घेतली. परंतु असं असलं तरी त्यांचं स्वतःच गाणं पुरुषी झालं नाही किंवा दुसऱ्या कुणाची नक्कल ठरलं नाही. या जिवंत उदाहरणातून योग्य तो आदर्श माझ्यासमोर ठेवला गेला. मला शिकवताना प्रभाताईंचं सगळ्या संदर्भात बारीक लक्ष असे. उत्तम पुरुष आवाज बनण्यासाठीची आवश्यक खर्ज साधना, योग्य उच्चारण, मोकळा आवाज, सर्व सप्तकात गुंजणारा आवाज यासाठी आवश्यक रियाजाची पद्धत त्यांनी मला दाखवली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला त्यांनी कधीही त्यांच्या स्त्रियांच्या पट्टीत गायला लावलं नाही कायम माझ्या सफेद दोन या सुरात शिकवलं. त्यासाठी त्यांना कष्ट पडले तरीही ! माझ्या शिक्षणाच्या काळातच पुरुषांनी पुरुष वाचक अर्थ असलेल्या बंदिशीच गाव्यात असा विचारही त्यांनी मांडला. भारतीय संगीतात असा विचार कुणीतरी प्रथमच मांडलाय. या मुळे भारतीय शास्त्रोक्त संगीत सादर करण्यात आमूलाग्र बदल घडू शकतो. स्वतःच्या योग्य बदल केलेल्या अशा बंदिशी त्यांनी मला शिकवल्यात जसं "जिया मोरा ना लागे बैरी बालमुवा" असं त्यांच्या स्त्री शिष्या गातात तर मला त्यांनी "जिया मोरा ना लागे बैरी सजनिया" अशा प्रकारचा बदल करायला लावला. असा विचार करायला मुळात तेवढी उच्च प्रतिभा आणि तशा विपुल नवीन संगीत रचना करणारी निर्मितीक्षमता हवी.  

सुरुवातीची वर्ष मी प्रभाताईंकडे राहूनच शिकलो. त्यामुळे शिकत असताना त्यांचं इतरांना शिकवणंही मला जवळून पहाता आलं. ताईंनी अनेक शिष्यांना प्रेमानं खाऊपिऊ घालून निरपेक्षपणे शिकवलं. एरवी प्रेमळ आणि अत्यंत रुजू व्यक्तित्वाच्या प्रभाताई शिकवताना फार काटेकोर आणि कडक असतात. एखाद्या स्वराची हालचाल एखादा कण किंवा खटका जरी वेगळा झाला तरी त्या अस्वस्थ होतात. आपलं ऐकणं एवढं चांगलं हवं की गाणाऱ्याने केवढा श्वास घेतलाय ते ही समजलं पाहिजे असं त्या सांगतात. बंदिश जशी आहे तशीच मांडण्याबद्दल त्या आग्रही असतात. शिकवतानाही त्यांच्या गाण्यातली सगळी वळणं, हालचाली इतक्या सुबक असतात की एखाद्या डौलदार, प्रमाणबद्ध शिल्पकृतीचा त्यात आभास व्हावा. 

 प्रभाताईंकडची शिक्षणाची सुरुवातीची वर्ष मला फार अवघड गेली. त्यांच्या समोर गाणं म्हणजे अडखळणं आणि धडपडणं यांची जणू काही शर्यतच सुरु व्हायची. एकतर माझं सुरुवातीचं संगीत शिक्षण वेगळ्या पद्धतीत झालं होतं, त्यात मी होतो १६-१७ वर्षांचा सोलापूरहुन पुण्या-मुंबई सारख्या मोठ्या शहरात प्रथमच शिकायच्या निमित्ताने आलेला. ताईंचं भारदस्त, एखाद्या देवतेसारखं व्यक्तिमत्व, त्यांच्या आवाजातलं तेज, परिणामकारकता या सगळ्यांचं दडपण येऊन माझ्या तोंडातून स्वरच फुटायचा नाही. शिकावं तर खूप वाटे पण अप्रूप, भीती, संकोचलेपण अशा संमिश्र भावना माझ्या मनात दाटून येत. पण कालांतराने शिकण्याच्या अनावर ओढीने या सगळ्या अडचणींवर मात केली. त्यांचं गाणं हळूहळू उलगडायला लागलं. भीतीची जागा भारावलेपणानी घेतली. झपाटून रियाझ सुरु झाला. स्वरांची वळणं, त्यांना जोडून येणारे गोड स्वरकण, रसिलेपण, भारदस्तपणा, मींडेची इंद्रधनुष्य आणि खटक्यांची अचूक पेरणी त्या मागचा कार्यकारणभाव, त्यात ओथंबलेली भावना साद घालू लागली. सरगम अन तानेचे अद्भुत आकृतिबंध सतत मनात फेर धरू लागले. ताईच्या गाण्याचं आणि विचाराचं वेगळेपण जाणण्याची क्षमता निर्माण होऊ लागली आणि संगीताचा एक वेगळा प्रदेश माझ्या समोर उलगडू लागला. 

 प्रभाताईंनी सुरुवातीला अनेक दिवस यमनच शिकवला. त्यांच्या सुरातून यमन सारखा रागही असा उभा रहात असे की आपण सुरुवातीला शिकलेला आपल्याला सोपा वाटलेला यमन तोच हा राग आहे का असा संभ्रम पडायचा ! अत्यंत सुरीला गुंजणारा गंधार आणि टोकदार तीव्र मध्यम अशा स्वरांची विशिष्ट स्थानं, कल्पक आणि प्रशांत आलापीतून रागरुपाला घातलेली साद, गंधारावरून रिषभाच्या मींडेने नादब्रह्मात विलीन होणारा षड्ज, विनासायास येणारे पेंचदार आणि दमसासयुक्त तानांचे गतिमान आकृतिबंध, लयीला लपेटून येणारी सरगम सारंच वेगळं! प्रभाताईंसारखे विस्तृत, ठेहराव युक्त आणि सुंदर आलाप फार थोड्या कलाकारांनी केले असतील. त्यांची तानांची रचना अत्यंत सौष्ठवपूर्ण, वक्र, वेगवान आणि चांगलीच गुंतागुंतीची असते. परंतू तरीही त्यातलं माधुर्य कुठेही कमी होत नाही हे विशेष! त्यांच्या गाण्यात विविध वळण वाटांनी जे स्वरकण आणि स्वरबंध वापरले जातात त्यांचं नोटेशन करणं ही कठीणच! परीक्षा पाहणारं. त्यांची योजना चुकली कि सगळंच फिस्कटणारं !त्यामुळे हे गाणं ऐकायला कितीही गोड, सहज सुंदर वाटत असलं तरी ते अनुसरायला अतिशय कठीण ! स्पष्ट, नादमय शब्दोचार, तालाच्या मात्रांवर आघात न करता भरून राहिलेली सूक्ष्म डौलदार लय, रागातल्या वेगळ्या जागा शोधून आकर्षक नवी स्वरवाक्य बनवणं आणि वेधकपणे समेवर येणं या सर्व गोष्टीचा एखाद्या संमोहन अस्त्रासारखा माझ्यावर प्रभाव पडला. संगीताचं भव्य आणि उत्कट दर्शन होत राहिलं आणि माझी झोळी शिगोशीग भरत राहिली. तालीम झाली की कित्येकदा त्या रात्री मला झोप यायची नाही. बंदिशी, लयीची चक्रं, नवनव्या कल्पक जागांची नक्षी, सगळं एकापाठोपाठ एक डोक्यात फिरत राहायचं. त्या गायकीतल्या तत्वांचा तो साक्षात्कारच होता. ते राग आणि बंदिशी गाताना आज ही ताई समोर बसून शिकवत आहेत असा भास होतो आणि एका अनामिक भावनेने अजाणताच कधी डोळे भरून येतात.

मला संगीतात मुंबई विद्यापीठाची डॉक्टरेट मिळाली तेव्हा त्यांनी आनंदाने पार्टी मागितली होती, माझ्या लग्नाला आशीर्वाद द्यायला त्या आवर्जून सोलापूरला आल्या होत्या आणि मला कोरोना झाला होता तेव्हा तब्येतीची विचारपूस करायला त्यांचा रोज हॉस्पिटलमध्ये फोन यायचा. अशा अनेक हृदय आठवणी आहेत. त्यांचं असं प्रेम मिळणं आणि त्या ऋणांत राहाणं हेच शिष्य म्हणून परम भाग्याचं आहे.   

अभिजात प्रतिभेचा अष्टपैलू हिरा: ज्या काळात शास्त्रोक्त संगीतातले दिग्गज आणि श्रोते केवळ परंपरागत संगीत प्रसुतीलाच अस्सल मानत असत त्या काळात प्रभाताईंनी केवळ स्वरचित बंदिशी गायल्या. वेगळा कलाविचार धुंडाळला. त्यातल्या वेगळेपणामुळे आणि उच्च गुणवत्तेमुळे जाणकारांना त्याला मान्यता द्यावी लागली. रसिकांना तर या नव्या रचनांनी केव्हाच आपलं दिवाणं केलं होतं. त्यांच्या पहिल्या स्वरचित बंदिशी असलेली मारुबिहाग, कलावती रागाची रेकॉर्ड् आज ही घराघरात वाजत असते. शास्त्रोक्त संगीताची कदाचित ही सर्वाधिक विक्री झालेली रेकोर्ड असावी. भारतीय शास्त्रोक्त संगीतात केवळ स्वरचित संगीत गाऊन अस उच्च स्थान प्राप्त करण ही ऐतिहासिक घटना आहे.

ख्याल, ठुमरी, दादरा, धृपद, धमार, टप्पा, टपख्याल, ठुमख्याल, तराणा, चतुरंग, त्रिवट, गीत, गझल, भक्तिगीत अशा अनेक गानप्रकरात 500 हून अधिक नव्या बंदिशी त्यांनी रचल्या आहेत. त्या पुस्तक रुपात प्रकशित ही केल्या आहेत. जागु मैं सारी रैना - मारुबिहाग, तन मन धन - कलावती, माता भवानी - दुर्गा, नंद नंदन - किरवाणी अशा त्यांच्या अनेक बंदिशी तर सामान्य श्रोत्यांनाही तोंडपाठ असतात. 

त्यांच्या ख्यालातून होणारा असर, परमोच्च सुरेलपण, आवाजाचा जाणीवपूर्वक केलेला वेगळा प्रयोग, लगावातली विविधता, विविध पैलूंतून उलगडत जाणारं अप्रतिम रागरूप, हळुवारपणे आणि संयतपणे सहजच व्यक्त होणारा भाव, लयीशी लडिवाळपणे खेळत अलगद येणारी सम हे सर्व श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारं असतं. प्रभाताईंची सरगम हा तर रसिकांना तृप्त करणारा आविष्कार. आलाप, तान, बोल यांच्या पेक्षा वेगळा सांगीतिक आशय व्यक्त करणारी त्यांची सरगम म्हणजे केवळ कसरत नाही, त्यात लालित्याचा परम सुंदर आविष्कार असतो. सरगमचा शास्त्रीय पक्षही सर्वप्रथम प्रभाताईंनीच संगीत जगता समोर ठेवला. सरगमला खऱ्या अर्थाने त्यांनी संगीत जगतात प्रतिष्ठा मिळवून दिली.  

प्रभाताईंना गाण्याचा कोणताही प्रकार वर्ज्य नाही. ललितरचनांमधला त्यांचा मुलायम, तरल आवाज अंत:करणात रुतून बसतो. मंद्र अथवा तार सप्तकात कुठेही सहजपणे वावरणारा, त्यांचा भावार्त सूर त्या काव्याचा अर्थ ऐकणाऱ्याच्या थेट काळजाला भिडवतो. प्रभाताईंची ठुमरी म्हणजे नुसतच लाजणं मुरडणं नाही. विचारांच्या बैठकीमुळे येणारा गहिरेपणा, संवेदनशील दर्दभरा आवाज आणि त्यातलं ओथंबलेलं रसिलेपण यामुळे श्रोते कायमच मंत्रमुग्ध झाले. प्रभाताईंनी कोणत्याही नव्या-जुन्या ठुमऱ्या गाव्यात! 'कौन गली गयो शाम', ' बालमा छेडो मत जा ', 'जा मैं तोसे नाहीं बोलू ' रतीया किधर गवाई, यां सारख्या ठुमऱ्यांमधल्या खास जागा, गुंफलेल्या अलौकिक स्वरसंगती, पुकार आणि हृदयस्पर्शीपणा आज एवढ्या वर्षानंतरही रसिकांना विसरता येत नाही. मला आठवतं एकदा प्रभाताईंचा पंढरपूरला कार्यक्रम होता, मला  त्यांच्या सोबत जाता आलं. कार्यक्रमानंतर आयोजकांनी ताईंच्या हस्ते पांडुरंगाची महापूजा केली. एक पागोटं बांधलेले वयस्क शेतकरी गृहस्थ दर्शनासाठी तिथे आले होते. त्यांनी प्रभाताईंना अक्षरशः साष्टांग दंडवत घातलं; म्हणाले "कौन गली गयो श्याम मध्ये तुम्ही पांडुरंगाला काय आतून हाक मारली आहे, आज तुम्ही आलेलं त्यालाही आवडलं असणार", त्या सामान्य शेतकऱ्याचे निरागस आणि मनापासून आलेले ते शब्द ऐकून आम्ही सगळेच क्षणभर स्तिमित झालो. असा जनसामान्यांपर्यंत पोहोचणारा त्यांच्या गाण्याचा अमिट प्रभाव आहे.

 प्रभाताईंनी उपशास्त्रीय संगीतातही सातत्यानं अनेक नव्या रचना केल्या तसंच अनेक पारंपरिक रचनांना त्यांनी आपला असा खास "प्रभारंग" दिला. घिर के आई बदरिया, कागा रे जारे जा, रंग डार गयो मोपे अशी अगणित कजरीगीतं, दादरे आणि होरी गीतं त्या ढंगदारपणे गातात. कैसा बालमा दगा दे गया (मिश्र कनकांगी) सावरो नंदलाला (मिश्र शिवरंजनी), बसंती चुनरिया (नायकी कानडा) अजहून आयो मेरो सावरीया (मांड भैरव) या वैशिष्ट्यपूर्ण ललित रचनाही प्रभाताईंच्याच. जुने रसिक सांगतात उमेदीच्या काळात जा कुणी शोधूनी आणा, दारी उभी अशी मी, हम जूनु मे जिधर निकलते है, बडी आरजू है, कळीचे फुल होताना अशा गझला गाताना त्या असा माहोल जमवीत की तोबा! 

साधनेची तप्तमुद्रा: प्रभाताईंनी काही रागांच्या स्वरूपात बदल केला, काही सांगीतिक घाट वेगळ्या प्रकारे हाताळले. सरगम सारख्या संगीत सामुग्रीचं वेगळेपण अधोरेखित केलं, राग समय, राग रस याना शास्त्राच्या कसोटीवर तपासून पाहिलं. अनेकदा विद्वानांनाही विचार करायला उद्युक्त केलं! या सगळ्या प्रयोगशीलतेमागे विचारांची बैठक भक्कमपणे उभी असलेली दिसते. दूरदृष्टी ठेऊन परंपरेला बदलण्याचं त्याचं धाडस आणि क्षमता दिसते. लोकप्रिय असणाऱ्या एखाद्या आघाडीच्या कलाकाराने संगीतावर लेखन करणं, संशोधन करणं, पुस्तकं प्रकाशित करणं किंवा शिक्षण क्षेत्रात काम करणं हे फार क्वचित घडलेलं आहे. प्रभाताईंनी या सगळ्या क्षेत्रातही मानदंड प्रस्थापित केले. 

प्रभाताईंनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गायकीने फार मोठ्या जनसमूहास सुमारे १९४०/५० च्या दशकापासून आज २०२३ पर्यंत मागची ७० - ७५ वर्षे आनंद दिला, १९५० च्या दशकात जेव्हा क्वचितच कुणी कलाकार परदेशात भारतीय शास्त्रीय संगीत सादर करत होता तेव्हा प्रभाताईंनी सतत परदेश दौरे करून कार्यक्रम, व्याख्यान, शिक्षण या सर्व मार्गांनी भारतीय कंठय संगीत परदेशात लोकप्रिय केलं. परदेशात तिकीट विक्री होऊन सभागृहांमध्ये व्यावसायीक कार्यक्रम केलेल्या प्रभा अत्रे याच पहिल्या भारतीय कंठ संगीताच्या कलाकार आहेत. दिवाळी पहाटचे आज अनेक कार्यक्रम होत असतात पण असा कार्यक्रम ताईंनीच 70 साली पहिल्यांदा केला होता. भारतीय शास्त्रीय संगीतातल्या शीर्षस्थ कलाकार म्हणून प्रभाताईंची कारकीर्द जगभरात अत्यंत यशस्वी ठरली. तो काळ त्यांनी अक्षरशः गाजवला.    

प्रभाताईंनी वैयक्तिक आयुष्यात प्रचंड चढ उतार अनुभवले. आघात पचवले. अडचणींना समर्थपणे तोंड दिलं. एकटीने वाटचाल केली. पण त्या कशाचीही कुठेच वाच्यता करत नाहीत. सतत असतो तो एक विलक्षण प्रसन्नपणा आणि चेहऱ्यावरचं समाधान. त्यांच्या वडिलांना फसवून एका भाडेकरूने हडप केलेली पुण्यातली जागा अनेक वर्षाच्या कोर्ट केस नंतर त्यांच्या ताब्यात आली. तिथे त्यांनी स्वखर्चाने भव्य स्वरमयी गुरुकुल बांधलं. देश परदेशातले अनेक विद्यार्थी तिथे राहून शिकतात. नियमित कार्यक्रम आयोजित केले जातात. आई-वडिलांचं आणि गुरूंचं ऋण त्यांनी खऱ्या अर्थानं फेडलं आहे. नव्या पिढीतल्या अनेक शिष्यांना सक्षम बनवलं आहे. 

अनेक कलाकारांच्या मागे त्यांच्या चाहत्यांचे, आयोजकांचे आणि प्रशंसकांचे कंपू असतात. ज्यामुळे त्या कलाकारांना आणखी मोठेपणा मिळतो. प्रसिद्धी मिळते. प्रभाताई या सगळ्यापासून कायमच दूर राहिल्या. त्यांच्या स्वभावातच एक अलिप्तपणा आहे. त्यांनी फक्त निखळ साधना केली, अत्यंत सचोटीने आणि प्रामाणिकपणे. पद्मविभूषण सह अनेक राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार स्वतःहून त्यांच्याकडे आले. पण त्या नेहमी परिधान करतात तशा शुभ्र वस्त्रासारखं त्यांचं निर्लेप व्यक्तिमत्व आहे त्याला वैराग्याची भगवी किनार आहे. "स्वरयोगिनी" हे विशेषण त्यांना सर्वार्थाने सार्थ आहे. 

प्रभाताईंसारख्या सर्वार्थाने श्रेष्ठ गुरुकडे शिकायला मिळणं हा ‘गुरुयोग’ अलौकिकच म्हणायला हवा! त्यांच्या मार्गदर्शनाने योग्य दिशेने माझी वाटचाल सतत होत राहिली. प्रत्यक्ष गाण्याबरोबरच त्यांचा संशोधन, चिंतन, योग्य प्रकारे शिकवणं आणि नव्या संगीत रचना करण्याचा गुणही मी घेण्याचा प्रयत्न केला. गायक म्हणून काम करत असतानाच माझ्यातल्या रचनाशीलतेला आणि लेखन क्षमतेलाही न कळत कोंब फुटले. बघता बघता अडीचशे तीनशे बंदिशी करून झाल्या, सुगम संगीताच्या क्षेत्रातही अनेक गाणी प्रसिद्ध झाली. काही पुस्तकही प्रकाशित झाली. डॉक्टरेट झाली. कधी कधी मागे वळून पाहताना माझा मीच विचार करतो की हे कसं शक्य झालं आपल्याला ? तेव्हा तुकाराम महाराजांच्या ओळी सहजच माझ्यासमोर येतात 

आपणा सारीखे करिती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे |

सद्गुरु वाचोनी सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी || 

-०-