Thursday 11 July 2013

खुणा

विश्रब्ध रात्री
दाटल्यात गात्री
सुरांच्या  दिठीने
चन्द्रल्या खुणा

रक्तात  मौनात
झुलतात झोकात
झाडात पानात
लपल्या खुणा


येशील जाशील
वळूनही पाहशील
दिसतील खुपतील
रुतल्या खुणा


माळून ठेवू
झाकून ठेवू
उधळून देऊ
साठल्या खुणा


मिरवल्यात काही
लपवल्यात काही
लाजल्यात काही
शीर्ण खुणा


झेलल्यात काही
कोरल्यात भाळी
आठवात  काही
जीर्ण खुणा




- अतिंद्र सरवडीकर




1 comment: