Wednesday, 26 October 2016

तेज उगवे, हर्ष  जागे,
मन्मनाच्या तळाशी,
दुःख संपे, स्मित उजळे,
दीप लागे उंबरऱ्याशी...

थंड वारा, शांत रात्री,
गीत गाई मुग्ध पक्षी,
उजळलेल्या दिशा दाही,
दीप लागे उंबऱ्याशी...

देई देवा स्वच्छ बुद्धि,
दुन दुबळ्या घास ओठी,
तेवलेला आत्मरूपी,
दीप लागे उंबर्याशी...

   - डॉ.  अतिंद्र सरवडीकर

"दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा"

😊🙏😊🙏😊🙏😊