Monday, 23 November 2020

फुलोंकी ऋत

फुलोंकी ऋत है ये फुलोंके मेले      
म फुलोंमे सोते है फुलोंमे जगते। 

दुनिया बनी है शोर-ए-गुल का दरिया
हम अपने मे मस्त है धून अपनी गुनगुनाते

वो भवरों की टोली आती है खिलखिलाते, 
हम सबसे है मिलते पर तनहा रह जाते

वह जुगनू के साये पल मे झिलमिलाते, 
जैसे यादों के पन्ने खुलते मिट जाते 

वह फुलोंके वादे वह फुलोंके चर्चे, 
ख्वाबोंकी सिलवट पे फुलों से चेहरे 

- डॉ अतिंद्र सरवडीकर

Saturday, 20 June 2020

स्वामी

स्वामी तुम्हासाठी मी एक गीत गाते
तुम्हा चरणी माझी भाव फुले वाहते...।।धृ।।

भिऊ नको भिऊ नको, पाठिशी राहिले,
माऊली होऊनी मजसाठी धावले,
चिंता माझी दुःख माझे तुम्हा पायी ठेवते...।।१।।

प्रेम दिसे डोळा, तेज ओसंडते,
पाठिवरी हात आणि मना बळ देते,
इच्छा केल्या पूर्ण, मार्ग मज दावले... ।। २।।

गुरू चरणी माझे मन हे स्थिरावले,
मानस पुजेस माझ्या गोड तुम्ही मानले,
धन्य जन्म वाटतो, अश्रू नेत्री दाटले...।।३।।

                            - डॉ अतिंद्र सरवडीकर

Friday, 22 May 2020

बंद दारे ...



भागलेल्या जीवा, नाही क्षणाचा विसावा, 
तापलेल्या डोई, वाहे भार संसाराचा, 

जन्म दिलास देवा, आता मरायचे कसे ? 
विषारी हवेतही घर आठवे... बोलवे...

वाट दूर दूर जाई, जसा सर्प पहुडेला,
दोन पाऊले सानुली, त्यात नुपूर दबलेला,

झपझप चालू, मैल हजार राहिले! 
कुणा हाती बाळ, कुठे थकले जोडपे, 

तहानलेला जीव बाप्पा, पोटी नाही दाणा! 
चोची वासून चालले...  थवे...  दिगंताला... 

भर मध्यान्हीच्या वेळी, गाव ओसाड झोपले!  
काळ रात्रींच्या मिठीत, जणू चैतन्य लोपले,  

अडलेल्या लेकीला या, घ्या गं आडोशाला! 
धीर धर बाई जन्म निखारा पेटलेला, 

हायवे कडेला तिचा तान्हुला जन्मला!
आता विचारावे कुणा? हा कोण्या राज्यातला?

किती सोसावे कळेना, किती जोडले जुळेना, 
गर्व धर्म जाती रिती मात्र जळता जळेनात 

कुठे येणे कुठे जाणे? चुकवावे कसे देणे? 
देह वेशीपाशी आला आणि बंद झाली दारे... 

                             - डॉ अतिंद्र सरवडीकर






Sunday, 10 May 2020

डॉ गोविंद शंकर काणेगांवकर, म्हणजे माझा सख्खा मामा, गोविंद मामा! आपल्या प्रचण्ड हुशारीच्या बळावर डॉक्टर होऊन 1960 च्या दशकात इग्लंडमध्ये स्थायिक झाला. जगातल्या श्रेष्ठतम नेत्र चिकित्सकांमध्ये मामाची गणना होते. जेव्हा भारताबाहेर स्थायिक होणं ही अतिदुर्मिळ गोष्ट होती तेव्हा तो इंग्लंड मधला एक अतिशय सन्मानीत नागरिक होता. इतका की इंग्लंडच्या राजवाड्यातून त्याला मेजवानीसाठी आमंत्रण असे. हाईथ या केण्ट परगण्यातल्या टुमदार गावी त्याचा एखाद्या किल्ल्यासारखा असलेला 30-35 खोल्यांचा प्रचंड बंगला, दिमतीला असणार्या रोल्स रॉईस सारख्या गाड्या त्यांच्या वैभवाची साक्ष देतात. पण ही काही मामाची पूर्ण ओळख नाही!!! त्याचा प्रेमळ स्वभाव आणि समाजाच्या मदतीला, विकासाला स्वत:ला वाहून घेणं ही त्याची खरी ओळख आहे... मामाने मागची अनेक दशकं भारतातल्या शेकडो सामाजिक संस्थांचा, व्यक्तिंचा स्वत:हून शोध घेऊन मदत केली आहे, लहान गावातल्या दवाखान्यांना महागडी यंत्र, उपकरणं घेऊन दिली आहेत! तो गरजू विद्यार्थ्यांना मदत करतो, पण ती करताना तो काय अट घालतो माहीत आहे? तो सांगतो हे पैसे मला परत करू नका पण अट ही की तुम्ही पुढे जाऊन एखाद्या गरजू विद्यार्थ्याला अशीच मदत केली पाहीजे. हे मदत करणारे हात घडवणं झालं!! त्याने ज्या संस्था आणि व्यक्तिना वैयक्तिकपणे अशी मदत केली आहे, तो आकडा म्हणे 50 लाख रूपयांपेक्षा जास्तय! तुम्ही जर त्याला भेटलात तर त्याचा साधेपणा पाहून तुम्हाला वाटणारही नाही की तुम्ही इतक्या मोठ्या व्यक्तीशी बोलत आहात! भारतीय परंपरा, संस्कृति, देव, पूजा यांवर त्याचा दृढ विश्वास आहे. तो पौरोहित्य शिकलाय आणि इंग्लंड मध्ये चक्क लग्न सुद्धा लावलियत अाणि पुरोहिताची गरज भागवली आहे. मामाला मोलाची साथ देणारी आमची विजया मामी, बार्शी सारख्या छोट्या गावातून आली आहे, तिथून झालेली पहिली डॉक्टर! आज पन्नासहुन जास्त वर्ष इंग्लंडमध्ये राहून, स्त्री रोग तज्न्य म्हणून तिने भारदस्त कारकिर्द घडविली आहे. पण तिला कधीही साडी शिवाय कुठल्याही पोषाखात पाहिलं नाही. गणेश उत्सवात 50-50 लोकांच्या पुरणपोळीच्या जेवणाची व्यवस्था ती हसत हसत करत असते! लता मंगेशकर, भारतीय क्रिकेट टीम, शरद पवार यांसारख्या अगणित दिग्गजांनी त्यांच्या घरचा पाहुणचार घेतलाय... परवाच वयाच्या ऐंशीव्या वर्षी मामाने इंग्लंड मधल्या बेघराच्या मदत निधीसाठी कितीतरी किलोमीटर सायकल चालवली आहे. आज आम्ही सगळे अाणि मामा मामींचे 30-40 स्नेही बार्शीला आलोय, निमित्त आहे मामा मामींच्या लग्नाचा 50 वा वाढदिवस... ! मला मामाची कितीतरी रूपंं आठवतायत, लहानपणी भेटवस्तू आणणारा, अनोख्या गोष्टी, अनुभव सांगणारा, लंडन महाराष्ट्र मंडळातल्या माझ्या कार्यक्रमात माझा सुंदर परिचय करून देणारा आणि परवा माझ्या लग्नाच्या वरातीत बेफाट नाचणारा... ! भगवंताची यथासांग पूजा पार पडतीये अाणि थोड्या वेळात माझ्या गाण्याचा कार्यक्रम आहे... सकारात्मकता आणि प्रसन्नता आसमंतात भरून राहिलिये... 😊

Wednesday, 29 May 2019

ब्रह्म हूँ मैं

ब्रह्म हूँ मै तेज हूँ ग्यान हू गुण खान हूँ
बुद्धि हूँ मै साधना प्रग्य चक्षु  कामना 
कण कण बसे उस ईश का सर्व व्यापी निर्माण हूँ  
ब्रह्म हूँ मै ब्रह्म हूँ ।। धृ ।।

ब्रह्म हू जल की तरह ढल जाऊ जिसमे भला 
कर दू जगमग हर जगह मै वह दिव्यांश हूँ
ब्रह्म हूँ मै ब्रह्म हूँ ।।१।। 

बुद्धी ग्यान ध्यान हूँ, राह अपनी खोज लू ,
नित्य आत्मोत्कर्ष का मै वही राहगार हूँ 
ब्रह्म हूँ मै ब्रह्म हूँ ।। २।। 

प्रग्या, मेधा, स्मृति बसे, सृजन की धारा बहें,
शोध, बोध खोजता मै आदी और अनंत हूँ
ब्रह्म हूँ मै ब्रह्म हूँ।। ३।। 

संग सबका साथी मै, दू लहू और स्वेद मै,
ले चलू जो शिखर तक, मै वही सुधांशू हूँ ,
ब्रह्म हूँ मै ब्रह्म हूँ ।। ४।। 

वंचितो को प्रेम दू  दुर्बलों को आसरा 
चाहे सबका जो भला मै वही सु-मनन हूँ
ब्रह्म हूँ मै ब्रह्म हूँ।। ५।। 

आंधियों को मिटाऊ हर कार्य को सम्हालू
ईश माने देश को जो मै वही आर्यांश हूँ
 ब्रह्म हूँ मै ब्रह्म हूँ।। ६।। 

शांती का है रस्ता मेरा अनुशासन और परंपरा 
संस्कृती को सिमेटा मै वही संस्कार हूँ
ब्रह्म हूँ मै ब्रह्म हूँ।। ७।। 

तत्व हू अमीट हूूँ ध्येय हूँ आत्मभान हूँ
ध्रुव जैसा अटल निश्चल मै वही विशेष हूँ
ब्रह्म हूँ मै ब्रह्म हूँ।। ८।। 

बल है और शौर्य भी विचार और निती भी 
पथ दिखाते दिप जैसा मै वह तेजांश हूँ
ब्रह्म हूँ मै ब्रह्म हूँ।। ९।। 

वेद और विज्ञान जानू कला, कौशल, प्रतिभा पहचानू
देके विद्या जगत उधरू मै वही 'गुरूपद' भी हूँ
ब्रह्म हूँ मै ब्रह्म हूँ ।।१०।। 

सकल मंगल करन चाहू जगत सुंदर करके जाऊ
व्यापू कण कण देह चंदन मै अखिल ब्रह्मांड हूँ
ब्रह्म हूँ मै ब्रह्म हूँ   ।।११।। 

- डॉ अतिंद्र सरवडीकर 
 

Saturday, 4 May 2019

धारावी

होतात म्हणेे लग्नं रस्त्यां लगतच्या झोपड्यांमध्येही! 
आणि नांदतात  कुटुंबंच्या कुटुंबं  हसत खिदळत! 

रांगतात मुलं रेल्वे ट्रैक लगतच्या घरांमधलीही! 
रेल्वेखाली न येता! आणि डास चावूनही मलेरिया न होता! 

वार्यावर उडून जातं छप्पर अन घरात येतो पाऊस रहायला  
कधी जळतात घरं; आणि मग येतो कुणी पत्रकार कैसा लगा? विचारायला.... 

माहेरवाशिण म्हणे इथे आनंदाने येते... 
फाटक्या चिंध्यांचं गाठोडं हुंडा म्हणून नेते.... 

काठी टेकवत हिंडणाऱ्या म्हातार्याने जन्मच बीन घराचा काढलेला असतो, 
त्याच्या जाण्यानं मात्र सारा मोहल्ला का रडत असतो?   

चंद्र म्हणे उगवतो तिथेही अन् वार्यातही गारवा येतो 
धारावीतल्या बसकट छपरांवरही दयाळ पक्षी तसाच गातो! 

- डॉ अतिंद्र सरवडीकर

Thursday, 7 March 2019

संगीतात लिंगभेद असतो का ? त्या आधारावर संगीताच्या स्वरुपात, प्रकटीकरणात सांगितीक द्रष्ट्या काय भेद घडतो? यांतली सिमारेषा कितपत ठळक असते ? आजच्या महिला दिनानिमित्त हा जरा वेगळा विचार. 
--------------------------------------------------------------------------

आजच्या अभिजात संगीताला व्यापून राहिलेला "ख्याल" हा गानप्रकार सुरवातीला 'जनानी', म्हणजे स्त्रियांसाठी बनवलेला गानप्रकार म्हणून ओळखला जायचा म्हणे. "सदारंग" हा ख्यालाचा आद्य रचनाकार महम्मदशहा राजाच्या दरबारात होता. राजाची मनधरणी करायला त्याने ख्यालाच्या रचना करायला सुरूवात केली. या रचनांचा विषय स्त्री केंद्री असायचा. स्त्रिया महम्मदशहा राजाला प्रियतम मानून त्याची मनधरणी करतायत, त्याला रिझवतायत, त्याच्या विरहाने व्याकुळ होतायत अशा अर्थाच्या या रचना होत्या. हा ख्याल रुजला, लोकप्रिय झाला. या विषयाने ख्याल गानप्रकाराचा  इतका ताबा घेतला, की सदारंगाला जाऊन शतकं उलटली तरी आजही ख्यालाच्या ' नायिकेची भूमिका मांडणार्या' रचनाच गायल्या जातात, रचल्या जातात. 
अल्लादियाँ खाँ, फैय्याज खाँ, वहिद खाँ, बडे गुलाम अली खाँ यां सारखे भरदार दाढी मिश्या राखणारे, व्यायाम करून एखाद्या पहेलवानासारखं शरीर कमवलेले गायक सुद्धा अशा नायिकेच्या भुमिकेतल्या बंदिशीच गात असत. भले त्या मागे मधुरा भक्तीचा भाव असेल, पण विषय नायिकाप्रधान होता हे मान्य करावं लागेल... 

ठुमरी हे तर मुर्तिमंत लालित्य ! तिथंही परत स्त्रित्वाचाच आविष्कार. ठुमरीचे बहुतेक रचनाकार पुरूष असूनही नायकाच्या तोंडी शोभेल असा विषय तिथे नाहीच. पुरूषही विरहाने व्याकूळ होतातच की, पण त्याची फारशी दखल कुणाकडुन घेतली गेल्याचं दिसत नाही. 

नाट्यसंगीताच्या प्रांतात बालगंधर्वांसारख्या अद्वितिय गायक नटाने कायम स्त्रीभूमिका केल्या. सवाई गंधर्व, दिनानाथ, मास्टर कृष्णराव, छोटा गंधर्व हे सगळे स्त्री भूमिका उत्तम निभवत...

सुगम संगीतात तर मला आश्चर्याचे अनेक धक्के वारंवार बसतात!  सुगम संगीतातल्या अनेक संगीतकारांवर स्त्री अावाजाचा, तिच्या अभिव्यक्तीचा जबरदस्त असर पडलाय असं मला फार जाणवत आलय ! तुज मागतो मी आता, तिन्ही सांजा सखे मिळाल्या, भय इथले संपत नाही ही सगळी पुरूष भुमिकेला साजेशी गाणी ना ? मग ती स्त्रीच्या आवाजात कशाला ? अगदी सुहाग रात है घुंघट उठा रहा हु मै, या असल्या ओळी सुद्धा स्त्री आवाजातच लोकांना ऐकवायची सवय आपल्या संगीतकारांनी लावलीये. मला आठवतं, कॉलेजात असताना एकदा संगीतकार सी.रामचंद्र यांच्या गाण्यांची एकदा स्पर्धा होती. तेव्हा असं लक्षात आलं होतं की त्यांच्या शेकडो गाण्यांमधे अगदी तुरळक पुरुष गीतं आहेत. असं अनेक संगीतकारांबाबतीत आहे ! 
इतर अनेक युगल गीतात पुरूष गायकांना येणार्या ओळी तुलनेने साध्या असतात. याचं शुक्रतारा सारखं उदाहरण आहेच (बाईला 2 कडवी आणि पुरूषाला एकचं, असं का ब्वा !!!!) 

 टिव्हीवरुन ओसंडून घरांत शिरू पाहणार्या अगणित सिरीयल्स पैकी किती थोड्यांची शिर्षकगीतं पुरूष आवाजात असतात?
 
स्त्रीचं असहाय होणं, दुर्बल असणं, प्रेमात पडणं, अल्लड असणं खूप वेळा संगीतबद्ध झालंय, पण पुरूषांचं गंभीर असणं, आतुन हळुवार असणं, तुटून प्रेम करणं, रांगडं असणं, जीव तोडुन जवाबदारी उचलणं, मवाळ असणं, लाजाळु असणं, वीर असणं किंवा रागिट असणं ही केवढी जास्त एक्सप्रेशन्स आहेत! ती कधी आणि कशी समोर येणार ? 
 जीवलगा, या चिमण्यांनो, जाहल्या काही चुका, भेटी लागी जीवा किंवा हिंदीतल्या लग जा गले सारख्या गाण्यांचा स्तर गाठू शकतील अशी पुरूषांची गाणी खरचं खूप कमी सापडतील. 
अलीकडे तर पुरूषांची गीतं म्हणजे केवल उंच उंच स्वर लावायचे एवढं एकच एक्सप्रेशन उरत चाललय मग तो सूर 'निरागस' असो वा 'दमलेला'.. 
आपल्याकडे हे दालन थोडं अधिक चांगल्या प्रकारे आणि अधिक Sensitivityने धुंडाळलं गेलं पाहिजे असं वाटतं.                                               - डॉ. अतिंद्र सरवडीकर 

--------------------------------------------