Tuesday, 31 December 2013
Sunday, 29 December 2013
Saturday, 28 December 2013
गीत व्हावे एक
ऐसे
अंतराला
स्पर्शणारे ,
नाद बिंदू
वेचताना
अनंताशी
पोचणारे ।
या जिवाच्या
घालमेली
त्या जिवाला सांगणारे,
दुख वेदनांतूनी फुलूनी
विश्व सारे
गंधणारे ।
वेचितांना सूर सुमने,
फुल पानी
जागणारे,
लाजणाऱ्या
मुग्ध कलिका,
चंद्र बिंदू
चुंबणारे ।
गंधवारा
वाहताना
तरु – लतांना वेढणारे,
थाप पडता
कडकडाती
रंध्र रंध्री
धुंदणारे ।
अंधारल्या
मनातुनी ,
एक पणती
लावणारे,
दोन हृदये
सांधताना ,
हात हाती
गुंफणारे ।
सूर माझे शब्द
माझे,
वाट माझी
चालणारे,
नाद बिंदू
वेचताना
अनंताशी
पोचणारे ।
-
डॉ अतींद्र
सरवडीकर
ही आर्त विराणी कुठली ?
ही चंद्रपारची वाणी ?
प्राणास फुटली गाणी ।
मूक संध्या समयी,
गहन धुक्याच्या वेळी,
रेखाटत बसली जोगीण,
ध्यानस्थ स्वरांच्या ओळी ।
आंदोलन स्वरगंगेच्या,
डोहात उतरले थोडे,
दिक्काला पैल निघाले,
चंद्रप्रभेचे रावे ।
कृष्ण बनातून फुलले,
त्या गीत फुलांचे झेले,
गंध दरवळे अवघे,
विश्व मोहुनी गेले ।
एकट कातर समयी,
त्या चंद्र भारल्या वेळी
त्या चंद्र भारल्या वेळी
जोगीण उतरण तुडवी,
तो चंद्र माळुनी केशी।
तो चंद्र माळुनी केशी।
लेऊनि शुभ्र भगवेसे,
'अलख' जागते वारे,
अनिवारश्या ओढीने,
सूर चालती मागे …
- अतिंद्र सरवडीकर
(गुरुवर्य डॉ. प्रभा अत्रे यांना समर्पित कविता)
२९ डिसेम्बर २०१३. पहाटे ३
Subscribe to:
Comments (Atom)
